टिळक यांचे चरित्र ही गोष्ट परत परत लिहावी अशीच आहे!
वासाहतिक काळात अखिल भारताचे नेतृत्व करणारे पहिले नेते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळकांमुळे महाराष्ट्राचे नाव पुन्हा एकदा भारतीय पातळीवर पोहोचले. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात टिळकांनी पहिल्यांदाच साध्य आणि साधन यांच्याविषयी स्पष्टता दिली. त्या अनुरोधानेच महात्मा गांधींनी भारताचा स्वातंत्र्यलढा पुढे नेला. टिळक केवळ सेनापती नव्हते. ते अव्वल दर्जाचे अभ्यासक आणि तत्त्वचिंतक होते.......